Monday, January 30, 2012

गगनबावड्याचं निसर्ग सौंदर्य...

गगनबावडा...कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटरवरचे प्रेक्षणीय पर्यटनस्थळ. घाटमाथ्यावरून कोकणात जाणारा हा मार्ग. पावसाळ्यात गगनबावड्याचं देखणेपण खुलतं. पाऊस इथं अक्षरशः कोसळतो. पाऊस थांबतो तेव्हा धुक्‍याची दुलई पांघरून जातो गगनबावड्यावर. इथून दोन घाटरस्ते कोकणात उतरतात. करूळ आणि भुईबावडा. निसर्गानं भरभरून दिलेली हिरवाई आणि अनुपम सौदर्य अनुभवण्यासाठी पावसाळ्यात इथं नक्की चक्कर टाकायला हवी.
संजय देसाई, कोल्हापूर
Source: http://www.esakal.com/esakal/20100626/4842329769178099670.htm
http://www.esakal.com/esakal/20100626/images/5179071592566206353/4978185064789994631_Mid.jpg





























No comments:

Post a Comment