गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप
त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य
त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली
To know more poems, please refer to the links:
http://marathi-poems .blogspot.in/2008/06/nisarga.h tml
खरंच, निसर्गासारखा सोयरा नाही. सोयरे जेव्हा सोयरसुतक दाखवित नाहीत. आणि मेल्यावर सुतक पाळतात. तेव्हा आपल्या अचेतन शरीराला या निसर्गातील वृक्षांचेच लाकडे चिरनिद्रा देण्यासाठी पुरेसे ठरतात.
ReplyDelete-व्यंकटेश कल्याणकर